कोल्हापूर | पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याची मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान महामार्गावर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली. टोल बंद झालाच पाहिजे, नही चलेंगी…नही चलेंगी दादागिरी या घोषणांमुळे टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळ उडाला.
किणी टोल नाका येथे गेले 2 ते 3 आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचे नेते राजू जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस सोडत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी भूमिका घेतली. बंद करण्यात आला. यावेळी मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर उभे राहून गाड्या सोडल्या. किणी आणि तासवडे टोलनाका राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडं वर्ग करण्यात आल्यानंतर या टोलनाक्यावरून पुन्हा वसुली करण्यास येत आहे.
मनसेकडून टोल वसुली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करत मनसेनं आमचं आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पोलिसांकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही मनसैनिकांकडून करण्यात आलाय.