सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केलं आहे. तेव्हा मुस्लिम समाजाने 3 तारखेपर्यंत भोंग्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीसमोर भोंगे लावून भोंग्याला भोंग्याने उत्तर देण्याचा इशारा, सातारा मनसे जिल्हा प्रमुख युवराज पवार आणि शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे.
सातारा मनसेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले, पोलिसांची परवानगी शिवाय कोणतीही लाऊड स्पीकर सिस्टीम लावू शकत नाही. तसेच रात्री 10 ते 6 या वेळेत स्पीकर लावू शकत नाही, असे कोर्टाचे आदेश आहेत. तेव्हा कोर्टाच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
साताऱ्यात 3 मे रोजी सर्वधर्मीय महाआरती
सातारा येथील ऐतिहासिक राजवाड्या समोर हनुमान मंदिरासमोर 3 मे रोज सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीस सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर, खंडाळा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघातील हिदू बाधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.