हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेच्या या विजयामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ‘खैरी सावंगी वाढोणा’ गट ग्रामपंचायत मध्ये मनसे चे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मध्ये मनसेचे ०७ पैकी ०४ सदस्य विजयी झाले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर, अहमदनगर मध्ये शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायत मनसेने जिंकली आहे. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्यासाठी हा मोठा विजय आहे. कोकणातही नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजयी ठरले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’