हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच मोबाईलचे व्यसन लागलेलं आहे. त्यामुळे अनेक सामाजिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना भिडणे कठीण झाल आहे. स्मार्टफोन लत एवढी वाढली आहे कि, लोकांना आता नोमोफोबिया (नो मोबाइल फोन फोबिया) हा आजार होत आहे. या आजारारमध्ये लोकांना फोनशिवाय राहण्याची भीती किंवा अस्वस्थता जाणवते. या आजारापासून वाचण्यासाठी तसेच वेळ बचत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करता येणार आहेत. तर आज आम्ही अशाच एका सेटिंग बदल सांगणार आहोत.
अॅप्सवर टाइमर कसा सेट करावा –
आपण फोन हातात घेतला कि, कधी दोन ते तीन तास होतात हे लक्षातच येत नाही . त्यामुळे अनेक कामे रखडली जातात . त्याच बरोबर सततच्या नोटिफिकेशन्समुळे चिंता आणि ताण वाढू शकतो. त्यासाठी पुढील प्रोसिजर फॉलो करा. सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावा. तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामधील डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोल या पर्यायावर क्लिक करा. काही स्मार्टफोनमध्ये अँप्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यानंतर स्क्रीन टाइम या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रोज तुम्ही कोणत्या अँपसाठी किती वेळ घालवला आहे याची माहिती मिळेल . तसेच ती एका चार्ट द्वारे दाखवली जाईल. तुम्हाला ज्या ज्या अँप्सना टाइम सेट करायचा आहे . त्या अँप्स निवडा. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर अँप टायमर यावर क्लिक करा . त्यावर सेट अँप लिमिट असं दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या अॅपसाठी दिवसातून किती वेळ वापरायचा आहे ते ठरवा, आणि टाइमर सेट करा. तुम्ही तो टाइम 5 मिनिटांपासून ते अगदी खूप तासासाठी सेट करू शकता.
नोटिफिकेशन सुद्धा मॅनेज करता येतील-
जशी अँपला प्रॉसिजर सांगितली त्याच प्रमाणे नोटिफिकेशनला आहे . फक्त अँप टायमर हा पर्याय न निवडता मॅनेज नोटिफिकेशन या ऑपशनवर क्लिक करा. पर्याय निवडल्यानंतर ऑल चॅट्स , ग्रुप असे अनेक नोटिफिकेशनचे पर्याय दिसतील. जी नोटिफिकेशन बंद करायची आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेली प्रक्रिया पूर्ण होईल.