Mobile ची बॅटरी खराब होऊ नये यासाठी ‘हा’ नियम लक्षात ठेवा

Mobile Battery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल (Mobile)  हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. तर अनेकांची ती गरज बनली आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय दिवस काढणं हे सगळ्यात कठीण काम झालं आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी (Mobile Battery) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ती खराब होऊ नये यासाठी बरेचजण काळजी घेत असतात. त्यामध्ये काही जण म्हणतात की, बॅटरी 100 टक्के चार्ज करावी किंवा बॅटरी 70 ते 80 टक्क्यादरम्यान चार्ज करावी. परंतु खरंच असं केल्याने फोन बॅटरीचे आयुष्य अधिक काळ राहते का? याचबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

या नियमांचा करा अवलंब

1) 40 ते 80 चा वापरला फॉर्मुला:

बॅटरीचे आयुष्य हे अधिक काळ टीकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनची चार्जिंग ही 40 टक्क्यापेक्षा कमी आणि 80 टक्क्यापेक्षा जास्त ठेऊ नका. असं केल्यास तुमच्या मोबाईलची बॅटरी ही अधिका काळापर्यंत टिकू शकते. त्यामुळे 40 ते 80 चा फॉर्मुला तुमच्या फायद्याचा ठरवू शकतो.

2) चार्जिंग करत असताना मोबाईलचा वापर करू नका

अनेकजनांना मोबाईल पासून दूर राहणे जमत नाही. त्यामुळे अशी लोक फोनची बॅटरी कमी असल्यानंतर चार्जिंगला लावतात खरं मात्र मोबाईल चार्जिंग होत असतानाच तो हातात घेऊन बसतात. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य तर कमी होतेच त्याचसोबत स्पोट होण्याचेही चान्सेस असतात. त्यामुळे ही गोष्ट टाळा.

3) मोबाईल डेटा बंद ठेवा

मोबाईलची बॅटरी चार्ज करताना तुम्ही जर मोबाईल डेटा तसेच ब्लूटूथ, लोकेशन यासारखे फंकशन्स चालू ठेवत असाल तर ते आजच बंद करा. जर तुम्ही बॅटरी चार्ज करताना सुद्धा डेटा सुरु ठेवत असाल तर तुमच्या बॅटरीचे आयुष्य कमी होईल. तसेच तुमच्या फोनची चार्जिंग जर 20 टक्के एवढी असेल तर ती तेवढी ठेऊ नका. यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.

किती असते एका फोन बॅटरीचे आयुष्य?

आजकाल तंत्रज्ञान एवढं वाढलं आहे की, यामुळे बॅटरीच्या व्हर्जन मध्ये नेहमीच बदल होतो. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य हे किती आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे. आजकालच्या मॉडर्न बॅटरीचे लाईफ हे 2 ते 3 वर्ष एवढेच असते. या बॅटऱ्या लिथियम-आयनच्या बनल्या आहे. त्यामुळे आजकालच्या बॅटरीचे आयुष्य हे केवळ 2-3 वर्षांपूरतेच मर्यादित राहते.

100 टक्के बॅटरी चार्ज करने योग्य की अयोग्य?

मोबाईल हा दिवसभर पाहता यावा यासाठी अनेकजण 100 टक्के मोबाईल बॅटरी चार्ज करतात. परंतु तुमच्या मोबाईल साठी ही गोष्ट सुद्धा घातक आहे कारण यामुळे सुद्धा मोबाईलच्या बॅटरीचे आयष्य कमी होण्याची शक्यता असते.