कहर!! आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचा पालन व्हावं यासाठी आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी सह्जरित्या करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे अँप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या अँपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

यातील ६९२ तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर दाखल तक्रारींपैकी ४९० तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आलंय. आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोटय़ा बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वतः भारत निवडणूक आयोगाच्या या अँपद्वारे तक्रार करू शकतात.

आतापर्यंत प्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या ५२ तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाक दडपशाही करण्याच्या २ तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या १३ तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या १२, मद्य वितरित करण्याच्या 14, विनापरवाना पोस्टरच्या ५८९, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणां संदर्भातील ९ तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या २२ तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या ८ तक्रारी आणि इतर ४७१ तक्रारींचा यात समावेश आहे.

इतर काही बातम्या-