बीड प्रतिनिधी । नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र विधासभा निवडणुक प्रचार दौऱ्यावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींच्या प्रचार सभेचा झंझावात सुरु आहे. त्यातच मोदींनी आज एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या सभेच परळी येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
येणाऱ्या काळात शेतमजूर, रस्तेकाम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. राज्यातील निवडणुका पाहता मोदींनी केलेली घोषणा राजकीय दृष्टया ऐतिहासिक आहे. ही घोषणा सत्यात आल्यास राज्यातील शेतमजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेचा परिणाम राज्यात भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी होतो का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
आपल्या भाषणात, मराठवाड्यातून दुष्काळ नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचही मोदी म्हणाले. तसेच पंकजा मुडेंना भरगोस मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित जनेतला यावेळी केले.