कोरोनाला हलक्यात घेऊ नका …पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दोन -तीन महिन्यांच्या लॉकडाउनंतर देशात पुन्हा एकदा बहुतेक सर्व गोष्टींचे व्यवहार सुरु झाले आहेत. दरम्यान, देशातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले. तसेच तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टिंक्षण या दोन गोष्टींच पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

भारतात चोवीस तासात आजपर्यंतचे सर्वाधिक ९६,००० नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४४ लाखांच्या पार पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने याबाबत माहिती दिली.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच म्हटलं आहे की, करोनाच्या संसर्गाचं आपल्यासमोर अभूतपूर्व आव्हान आहे. परंतू भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील कोरोनाशी लढण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. त्याचबरोबर जोपर्यंत यावर लस येत नाही तोवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’