आपण जाणतोच की भारत एक आध्यात्मिक आणि निसर्गसंपन्न देश आहे. त्यातही उत्तराखंड म्हणजे अद्भुत सौंदर्य आणि अध्यात्माचं माहेरघर म्हटलं जातं. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उत्तराखंडला एक मोठी भेट मिळाली आहे. मोदी सरकारकडून उत्तराखंड मधील केदारनाथ धाम साठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे
सोनप्रयाग ते केदारनाथ असा 12.9 किलोमीटरचा हा रोपवे असणार असून त्यासाठी 481 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कडून हे बांधकाम केले जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,’ याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की सध्या आठ ते नऊ तासांचा प्रवास हा 36 मिनिटांवर येईल. यात 36 लोक बसू शकणार आहेत.
केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी चारधाम यात्रेचे नियोजन मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि या लोकांसाठी ही योजना खूप मोठं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. त्यामुळे चारधाम यात्रेला यामुळे चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर यामुळे तेथील स्थानिक व्यवसायांना सुद्धा फायदा होणार आहे. क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
केदारनाथ रोपे प्रकल्प उत्तराखंड रोपवे कायदा 2014 अंतर्गत कार्य करेल जो परवाना ऑपरेशनचे निरीक्षण सुरक्षा आणि भाडे निश्चित करण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहेब मध्ये रोपवे प्रकल्प बांधण्याचा आहे. यासाठी 2730 कोटी रुपये खर्च केले जातील या प्रकल्पाद्वारे हेमकुंड साहेब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातात येणार आहे.