रघुराम राजन यांनी केलं अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकारणावर जास्त लक्ष घातल्यानं भारताचा आर्थिक विकास मंदावला आहे अशा शब्दात रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, ” देशातील अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सध्याच्या सरकारचा राजकीय, सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यावर भर असल्याने देशाची आर्थिक वाढ मंदावली आहे.”

रघुराम राजन यांनी देशाचा विकासदर घसरल्याच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला लक्ष केलं . ”लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारने राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे.”असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.  

 

Leave a Comment