विशेष प्रतिनिधी। दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यानंतर आता सरकारी महागाई कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (९ऑक्टोबर) झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ही भत्ता वाढ जुलै २०१९ पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास ६५ लाख पेन्शन धारकांना होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाने सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या एका वर्षात केंद्रीय सरकारने दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात शेवटच्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणारा महागाई भत्ता १२ टक्के केला होता. यापूर्वी महागाई भत्ता हा ९ टक्के मिळायचा. सरकारच्या या निर्णयानंतर सरकारी तिजोरीवर ९,१६८.१२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, अशी माहिती तेव्हा सरकारने दिली होती.
इतर काही बातम्या-
सणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह
वाचा सविस्तर – https://t.co/j7QSyoeXIc@INDIANECONOMY3 @Economyae @narendramodi #Economyslowdown #EconomyCrisis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
वडिलांसोबत दोन्ही मुले प्रचाराच्या मैदानात! आदित्य कोल्हापूर तर तेजस ठाकरे संगमनेरमध्येhttps://t.co/K4glBqisap@ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
उदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यांत दीड कोटींची भर
वाचा सविस्तर – https://t.co/ghVcSIbAag@Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks #loksabha2019#Vidhansabha2019 #electioncommison
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019