अर्णव गोस्वामींच्या अटकेवर मोदी सरकार संतप्त; प्रकाश जावडेकर म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्रातील मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही अर्णववरील कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. (Prakash Jawadekar criticise Maharashtra Govt on arrest of Arnab Goswami)

प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. (Arnab Goswami In Police Custody) 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in