मुंबईत पथविक्रेत्‍यांना मिळणार सरकारकडून कर्ज; जाणून घ्या योजना आहे तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शहरातील पथविक्रेते (Hawker) अनौपचारिक नागरी अर्थव्‍यवस्‍थेचा अत्‍यंत महत्‍वाचा घटक आहे. ‘कोविड- १९’ (साथीचा रोग) असल्‍यामुळे टाळेबंदीमध्‍यें (Lockdown) पथविक्रेत्‍यांच्‍या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासन पुरस्‍कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्‍मनिर्भर निधी’ (PM SAVNIDHI) अंतर्गत पथविक्रेत्‍यांसाठी विशेष सूक्ष्‍म – पतपुरवठा सुविधा योजनेची बृहन्‍मुंबईत अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना २४ मार्च २०२० रोजी व त्‍यापूर्वीच्या पथविक्रेत्‍यांसाठी संबंधित अटी व नियमांसापेक्ष लागू आहे.

योजनेची उद्दि‍ष्‍टे
१)पथविक्रेत्‍यांना सहाय्य म्‍हणून खेळते भांडवल रु. १०,०००/- कर्ज स्‍वरुपात उपलब्‍ध करुन देणे.

२)नियमित परतफेड करण्‍यास प्रोत्‍साहन देणे.

३)डिजिटल व्‍यवहारास प्रोत्‍साहन देणे.

योजनेचा तपशील
१)नागरी पथविक्रेते १ वर्षाच्‍या परतफेड मुदतीसह रु. १०,०००/- पर्यंतचे भांडवल कर्ज घेण्‍यास आणि त्‍याची दरमहा हप्‍त्‍याने परत फेड करण्‍यास पात्र असतील.

२)सदर कर्जावर प्रचलित दराप्रमाणे व्‍याज दर लागू राहतील.

३)विहित कालावधीमध्‍ये कर्ज परतफेड केल्‍यास ७% व्‍याज अनुदान मिळण्‍यास पात्र.

असा करा अर्ज

१)या योजनेचा लाभ मिळविण्‍यासाठी पथविक्रेत्‍यांनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

२)अर्ज करण्‍यापूर्वी पथविक्रेत्‍यांच्‍या आधार कार्डाची त्‍यांच्‍या मो‍बाईल क्रमांशी जोडणी असणे आवश्‍यक आहे.

३)ऑनलाईन अर्ज करण्‍यापूर्वी पथविक्रेत्‍यांनी लाभार्थी निकष पूर्ण करीत असल्‍याबाबतची कागदपत्रे तयार ठेवावीत. उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र/पथविक्रेता सर्वेक्षणाचा एस.आर.व्‍ही क्रमांक, बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्‍सस (असल्‍यास), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्‍यादी

४)अर्ज भरण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर पथविक्रेत्‍यांने अर्ज क्रमांक माहितीसाठी जतन करुन ठेवावा. पथविक्रेत्‍याला लघुसंदेशांद्वारे अर्जाच्‍या स्थितीची माहिती वेळोवेळी प्राप्‍त होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment