कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला सर्वस्वी केंद्रसरकार व योगी सरकार जबाबदार आहे. कुंभामेळाव्याला धार्मिक उत्सावाला जी खुल्या प्रमाणात परवानगी दिली, ते निषेधार्ह आहे. तसेच देशातील कोरोनाच्या परिस्थितीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण म्हणाले, देशातील निवडणूका हाताळलेल्य आहेत. तसेच कुंभामेळाव्याला दिलेली परवानगी यामुळे केंद्र सरकार हे बेजबादार आहे. कुंभामेळाव्यात जे काही घडत आहे, ते निषेधार्ह आहे. बेजबादार सरकारकडून आणखी काय अपेक्षा बाळगावी. त्यामुळे हा प्रकार बरोबर नाही.
कालची देशातील कोरोना बाधितांची आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी रोज ९६ हजार रूग्ण देशात आढळून येत होते. काल १ लाख ८४ हजारपेक्षा अधिक रूग्ण देशात आढळले आहेत. देशातील या सर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.