हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. यासंदर्भात एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.
जान शेखने 9 सप्टेंबरा जाण्याचं नियोजित केलं. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कनफॉर्म होत नव्हतं. तर त्याने 13 तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्याने तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं
जान मोहम्मदवर कर्ज होतं. आधी तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतलीच. त्याचा हफ्ता भरू न शकल्याने बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक टू व्हीलर खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं