कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मलकापूर नगरपरिषदेने लसीकरण कार्यक्रम हाती घेतला असून, या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र काले व उपकेंद्र मलकापूर यांच्या संयुक्तरित्या भारती विद्यापीठ व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण महिला विकास केंद्र या लसीकरण केंद्रावर दि. 8 सप्टेंबर रेाजी उच्चांकी लसीकरण करणेत आले. सातारा जिल्हयामध्ये मलकापूर या ठिकाणी या दिवशी 1 हजार 198 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सदरची संख्या सातारा जिल्हयामध्ये उच्चांकी असून, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्या क्रमांकाने लसीकरण करणेत आले असलेची माहिती मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
मलकापूर नगरपरिषदेने दोन्ही लसीकरण केंदावर आजपर्यंत 12 हजार 751 नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. मलकापूरमध्ये 60% पेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतलेली आहे. मलकापूर शहरात मोठ्या प्रमाणावर शासकिय नोकरी वर्ग व नोकरी नंतर सेवानिवृत्त होणारा वर्ग मोठ्याप्रमाणावर राहत असलेने या नागरिकांच्यामध्ये लसीकरणाविषयी जागृकता असलेने मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे. मलकापूर नगरपरिषदेने कोविड-19 च्या अनुषंगाने शहरामध्ये दैनंदिन नागरिकांचीमाहिती संकलन करून योग्य वेळी उपाययोजना करणेसाठी 26 आशासेविकांची नियुक्ती करणेत आलीअसून, प्रत्येक प्रभागासाठी प्रभाग अध्यक्ष व नोडल अधिकरी यांची नियुक्ती केली असलेने नगरपरिषदहद्दीत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणेसाठी मदत झालेली आहे.
लसीकरण यशस्वी करणेसाठी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे यांनी स्वत: नागरिकांना लस टोचणेसाठी लसीकरण केंद्रावर दिवसभर हजर होत्या. तसेच नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सुचना देऊन जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध करून देणेबाबत सुचना दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरणा संदर्भात नियेाजनाची माहिती घेतली. यावेळी मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, नगरसेवक, नगरसेविका, प्रभाग अध्यक्ष, मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आर. बी. यादव, पर्यवेक्षक श्री. पटेल, आरोग्य सेविका सौ. भोसले, सौ. पावणे, लसीकरण केंद्राचे नोडल अधिकारी ज्ञानदेव साळुंखे तसेच नोडल अधिकारी त्यांचे सहाय्यक, आशासेविका यांनी योगदान दिले.