अखेर ठरलं! मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव; जाणून घ्या त्याच्यांविषयी सविस्तर माहिती

Mohan Yadav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर भाजप मध्य प्रदेशची सत्ता कोणाच्या हातात देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज ते नाव समोर आले आहे. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता नरेंद्रसिंह तोमर यांच्यानंतर मध्य प्रदेशची सत्ता मोहन यादव यांच्या हातात गेली आहे.

डॉ. मोहन यादव हे उजैन दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मोहन यादव यांचे नाव कधीच समोर आलेले नव्हते. मात्र आता मोहन यादव यांच्याकडे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली होती . या बैठकीमध्ये मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मोहन यादव कोण आहेत?

मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून समोर आलेले मोहन यादव हे उजैन दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. तसेच ते संघाचे खास कार्यकर्ते देखील आहेत. मोहन यादव हे ओबीसी समाजातील आहेत. मध्य प्रदेश राज्यातील एकूण ओबीसी लोकसंख्या 50 टक्के आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचा फायदा बघून भाजपने मुख्यमंत्री पदासाठी मोहन यादव यांचे नाव जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये शिवराज सिंह चौहान यांनीच मोहन यादव यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले होते. अखेर या नावावर विचार करण्यात आल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर कोणती जबाबदारी?

भाजपने केलेल्या घोषणेनुसार मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव बनले आहेत तर राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा या दोघांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.