टिकटॉकवरून लोकप्रिय झालेल्या तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सोशल मीडियावर टिकटॉक अ‌ॅपवरून प्रसिद्ध झोतात आलेल्या २७ वर्षीय जीम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मोहित मोर असे या तरुणाचे नाव असून दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी रात्री तिघांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली . टिकटॉक अ‌ॅप मोहित मोर याचे ५.१७ लाख फॉलोअर्स होते. तो हरियाणामधील बहादूरगड येथील असून दिल्लीत वास्तव्यास होता.

माहितीनुसार , मोहित मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका फोटोकॉपी शॉपमध्ये बसला असताना गोळ्या घालण्यात आल्या. मोहितवर एकापेक्षा जास्त वेळा गोळ्या चालवण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मोहितचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत असून, याप्रकरणी नजफगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना जे फुटेज मिळालं आहे त्यामध्ये हत्येनंतर तिघेजण रस्त्यावर धावताना दिसत आहेत. यापैकी दोघांनी हेल्मेट घातलं आहे. यापैकी एकाने कोणतंही मास्क घातलं नसल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. इतकेच नाही तर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here