Ladaki Bahin Yojana: लाभार्थी महिलांना मोठा दिलासा!! या तारखेला मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

0
118
Ladaki Bhaini Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ladaki Bahin Yojana| राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण असलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” (Ladaki Bahin Yojana) योजनेचा फेब्रुवारीतील हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवार यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वाटप केले जाणार आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 पर्यंत हा निधी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

कधी जमा होणार हप्ता?(Ladaki Bahin Yojana)

राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. आतापर्यंत जुलै ते जानेवारी 2025 या सात महिन्यांचे हप्ते वाटप करण्यात आले आहेत. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा मिळत असल्याने अनेक महिला प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारने हा प्रश्न सोडवत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, 5 मार्च 2025 पासून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि 8 मार्चपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

किती रुपये मिळणार?(Ladaki Bahin Yojana)

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित हप्ते जमा करताना एकूण 3,000 रुपये मिळतील. काही महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नसतील, तर त्यांचे पूर्वीचे थकबाकीचे पैसेही या कालावधीत जमा होऊ शकतात.

दरम्यान, महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे. आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हप्ता मिळणार असल्याने अनेक महिलांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता राज्यातील लाभार्थी महिलांनी स्वतःच्या बँक खात्याची माहिती अपडेट ठेवावी आणि अधिकृत खात्यांवरून वेळोवेळी अपडेट्स घेणे आवश्यक आहे. तसेच, जर निधी वेळेवर जमा झाला नाही, तर स्थानिक महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.