नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाची (ED) टीम बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जॅकलीन ED च्या चौकशीत सामील होण्यास 4 वेळा असमर्थ ठरली आहे. याआधी जॅकलीन 25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर रोजी ED समोर हजर नव्हती आणि नंतर आज (18 ऑक्टोबर) ती सुद्धा हजर झाली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ED आज गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी करणार होती, मात्र ही अभिनेत्री ED च्या कार्यालयात आलीच नाही. याआधीही, ED ने 30 ऑगस्ट रोजी या प्रकरणात जॅकलिनचे स्टेटमेंट नोंदवले होते. सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) जॅकलीन फर्नांडिसचे स्टेटमेंट नोंदवले जात आहे.
जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे की नाही याची तपासणी एजन्सी करत आहे. दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि त्याने कारागृहातून रॅकेट चालवले आहे.
त्याचबरोबर आज तकने एका सूत्राला सांगितले आहे की, जॅकलिनने शुक्रवारी ED च्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिन बॉलिवूड अभिनेता सलमान खानची जवळची मानली जाते. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे आहेत तर आई मलेशियाची आहे. जॅकलिनचे वडील संगीतकार आहेत तर आई एअर होस्टेस होती. जॅकलिन 4 भावंडांमध्ये सर्वात लहान असून जॅकलिनला एक मोठी बहीण आणि 2 मोठे भाऊ आहेत.
जॅकलिन फर्नांडिस 2006 मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवडली गेली त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. 2009 मध्ये, ती मॉडेलिंग असाइनमेंटसाठी भारतात आली आणि यावेळी ‘अलादीन’ चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली आणि निवड झाली. जॅकलिनने या चित्रपटातून पदार्पण केले. जॅकलिन तिच्या चित्रपटात परिपूर्णता आणण्यासाठी हिंदी शिकली.
जॅकलिनने जरी ‘अलादीन’ मधून पदार्पण केले तरी तिला खरी ओळख ही ‘मर्डर 2’ मधून मिळाली. यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलेच नाही. ‘हाऊस फुल 2’, ‘रेस 3’, ‘किक’ सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय दाखवला. जॅकलिन अलीकडेच ‘भूत पोलीस’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामि गौतम यांच्याही भूमिका होत्या.