Monsoon Tourism : पावसाळ्यात करा माथेरानची सफर; ‘या’ 5 ठिकाणांना भेट देऊन घ्या मनसोक्त आनंद

Monsoon Tourism top places in matheran
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री झाली असून पावसाच्या सऱ्या जोरदार कोसळत आहेत. पावसात चिंब होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यांत जावं (Monsoon Tourism) आणि मनसोक्तपणे पावसाळ्याचा आनंद घ्यावा असं अनेकांना वाटत असत. तुम्ही सुद्धा अशाच निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला मुंबईपासून जवळ असलेल्या अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्याला भेट देऊन तुम्ही एक दिवसाची ट्रिप आरामात एन्जॉय करू शकता. हे पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान…. मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेलं माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. पर्यटनासाठी हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध असून खास करून पावसाळ्यात तुम्ही माथेरानमध्ये मनसोक्त आनंद घेऊ शकता.

माथेरानमध्ये 38 विव्ह पॉईंट आहेत. सुंदर धबधबे, निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार जंगले, ट्रेकिंग, सनसेट, सनराईज पॉईंट आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे माथेरानची सैर म्हणजे निसर्गाचा खराखुरा आस्वाद म्हणता येईल. माथेरानमध्ये लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, शार्लोट लेक, मंकी पॉइंट, माथेरान, इको पॉइंट, माथेरान, पोर्क्युपिन पॉइंटला तुम्ही भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला माथेरान मधील अशाच काही पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत, ज्याठिकाणी पावसाळयात जाणे अतिशय बेस्ट ठरेल.

Dodhani Waterfalls
Dodhani Waterfalls

1) दोधनी धबधबा- Dodhani Waterfalls

दोधनी धबधबा माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी असून पनवेलहून रस्त्याने सहज जाता येते. माथेरानमध्ये तुम्हाला रोमांचकारी अशा काही ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर दोधनी धबधब्यातील रॅपलिंग तुम्हाला नक्कीच रोमांचित करेल. तुम्ही हौशी आणि साहसी असाल तर उतारावरून किंवा खडकावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. याठिकाणी रॅपलिंग करताना चांगली मजबूत दोरी, डिसेंडर, सीट हार्नेस सोबत हातमोजे आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट घाला. माथेरानची सफर करताना रॅपलिंगचा आनंद तुम्हाला आयुष्यभराचा अनुभव देईल.

Chanderi Caves
Chanderi Caves

2 चंदेरी ट्रेक Chanderi Caves- Monsoon Tourism

चंदेरी ट्रेक हे माथेरानच्या सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक मानलं जाते. चंदेरी लेणी ही 800 मीटर उंचीपर्यंत पसरलेली एक भव्य पर्वतराजी आहे . हि लेणी बदलापूर पासून कर्जतला जाताना लागते. माथेरानमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल तर चंदेरी लेणी ट्रेकिंगसारखा दुसरा आनंद नाही. याठिकाणी ट्रेकिंग करताना गुहांमधून दिसणारे दृश्य नक्कीच तुमच्या मनाला मोहित करतील यात शंकाच नाही. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान याठिकाणी ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

Charlotte Lake
Charlotte Lake

3) शार्लोट लेक Charlotte Lake –

माथेरानच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेलं शार्लोट लेक आपल्या शांत वातावरणासाठी ओळखलं जाते. माथेरान रेल्वे स्टेशनपासून 2 किमी अंतरावर असलेल्या या तलावाला पावसाळ्यात भेट नक्कीच बेस्ट ठरत कारण पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon Tourism) हा 50 फुटी तलाव पूर्णपणे भरलेला असतो. शार्लोट लेकच्या किनाऱ्यावर बसून तुम्ही मनमोहक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता. पक्षी निरीक्षक असाल तर या तलावाच्या ठिकाणी सकासकाळी भेट देऊ शकता.

Louisa Point
Louisa Point

4) लुईसा पॉइंट Louisa Point –

माथेरानमध्ये सुमारे 38 व्ह्यूपॉइंट्स आहेत परंतु या सर्वात लुईसा पॉइंट हे पर्यटकांचे नेहमीच मुख्य आकर्षण ठरलं आहे. लुईसा पॉइंट हे मार्केटपासून सुमारे 1.5 किमी अंतरावर असून येथे पायी जाण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतील. लुईसा पॉईंट वरून आसपासचे किल्ले, निसर्गरम्य धबधबे, बगीचे अगदी सहज दिसतात. माथेरानमध्ये काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर लुईसा पॉईंटला सर्वात आधी भेट द्या. लुईसा पॉईंटवरून विशाळगड किल्ल्याचे दिसणारे विहंगम दृश्य नक्कीच चुकवू नका. वर्षातील बाराही महिन्यात तुम्ही लुईसा पॉइंटला भेट देऊ शकता. पर्यटक याठिकाणी येऊन मनसोक्त फोटोसेशनही करतात.

Neral-Matheran Toy Train
Neral-Matheran Toy Train

5) नेरळ-माथेरान टॉय ट्रेन- Neral-Matheran Toy Train

तुम्ही माथेरानला सहलीला गेला आणि नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सफर केली नाही तर मग तुमच्या या पर्यटनाला काहीच अर्थ राहणार नाही. माथेरानमधील सर्वोत्तम ऍक्टिव्हिटी म्हणजे नेरळ – माथेरान ट्रेनचा प्रवास…. ही रेल्वे 21 किलोमीटर अंतर पार करते. हिरवीगार जंगले आणि सुंदर टेकड्यांमधून प्रवास करणारी हि रेल्वे पर्यटकांना वेगळाच आनंद देते. त्यातही जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर या ट्रेनमधून प्रवास करताना त्यांच्या आनंदाला पारावरच उरणार नाही. माथेरान पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या रेल्वेचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतही समावेश आहे.