Monsoon Tourism : पावसाळ्यात करा दक्षिण भारताची सफर; IRCTC घेऊन आलंय जबरदस्त टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी अल्हाददायक वातावरण दिसत आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फिरण्याचा (Monsoon Tourism) मनसोक्त आनंद घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत असत. तुम्ही सुद्धा या दिवसात पर्यटनाचा विचार करत असाल तर IRCTC आपल्यासाठी एक मस्त आणि परवडणारे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या अंतर्गत तुम्ही दक्षिण भारताचा प्रवास करू शकाल. IRCTC चे हे टूर नेमकं किती दिवसाचे आहे आणि तुम्हाला यासाठी किती खर्च पडेल याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

IRCTC च्या या टूर पॅकेज मध्ये तुम्ही साऊथ इंडियाच्या सुंदर ठिकाणी सैर करू शकतात. हा प्रवास विशाखापट्टण पासून सुरु होऊन कर्नाटक, केरळ, बेंगळूरु आणि तमिळनाडूचा पश्चिम घाट अशा वेगवेगळे डेस्टिनेशन या पॅकेज मध्ये असतील. हा प्रवास 10 ऑगस्ट पासून सुरू होणार असून 15 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. म्हणजेच एकूण 5 रात्र आणि सहा दिवसांसाठी हे टूर पॅकेज असणार आहे. या पॅकेज अंतर्गत प्रवाशांचे रात्रीचे आणि सकाळचे जेवण, 5 रात्री डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सोय, प्रवाशांचा विमा, IRCTC टूर एस्कॉर्ट सेवा, तसेच त्या त्या ठिकाणी खाजगी वाहनांची सुविधा इत्यादी सोयी दिल्या जाणार आहे.

या पॅकेजची किंमत किती? (Monsoon Tourism)

आयआरसीटीसी च्या या टूर पॅकेज ची किंमत एका व्यक्तीसाठी 35 हजार 210 एवढी असून दोन व्यक्तींसाठी 26 हजार 650 रुपये आणि तीन व्यक्तींसोबत टूर फिक्स करत असाल तर प्रत्येकी 26 हजार 650 रुपये एवढा खर्च तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्या सोबत प्रवासामध्ये लहानमुलं देखील असेल तर त्यांचे वेगळे पैसे द्यावे लागतील. ५ ते ११ वर्षाच्या मुलांसाठी अंथरून सहित 23 हजार 715 आणि विना अंथरून 25 हजार 050 एवढा खर्च द्यावा लागेल त्याचबरोबर २ ते ४ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 7 हजार 650 रुपये भरावे लागतील.

बुकिंग कस करावं ?

तुम्हाला या टूर मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आईआरसीटीसी च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पॅकेजचे बुकिंग करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही पर्यटन सुविधा केंद्र, क्षेत्रिक कार्यालयांमध्ये, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संपर्क करून बुकिंग करू शकतात.