Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्यासाठी दक्षिण भारतातील Top 5 पर्यटन स्थळे; एकदा तरी जावाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मित्रांनो, आपला भारत देश नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत…. देशात पर्यटन करावी अशी अनेक ठिकाणी आहेत. परंतु कोणत्या ऋतूत कुठे फिरायला जायचं हे ज्याला कळत तोच खरा पर्यटक. सध्या भारतात मान्सून दाखल झाला असून पावसाळ्याच्या (Monsoon Tourism) या दिवसात मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत जाऊन आनंद साजरा करावा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घ्यावा असं वाटलं तर काय आश्चर्याची गोष्ट नाही. तुम्ही सुद्धा अशाच पर्यटन स्थळाच्या शोधात असाल आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला कसली चिंता नसेल तर आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील ५ प्रसिद्ध पर्यटन स्थळे सांगणार आहोत ज्याठिकाणी जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता.

दक्षिण भारत म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अथांग समुद्रकिनारा, कोसळणारे धबधबे, घाट, भलीमोठी मंदिरे आणि डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग… त्यामुळे पर्यटनासाठी दक्षिण भारतात जाणे यासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे यंदाची पावसाळ्यात पर्यटनासाठी दक्षिण भारतातील कोणकोणती ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ठरतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alleppey

१) अलेप्पी (Alleppey) –

अलेप्पी हे केरळ राज्यातील अविश्वसनीय आणि अतिशय प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी असलेले सुंदर बॅकवॉटर, समुद्र किनारे आणि सरोवरांमुळे अलेप्पीला पूर्वेचा व्हेनिस म्हणूनही ओळखले जाते. येथील नारळाची झाडे, दाट हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना नक्कीच मोहित करेल. याशिवाय अलेप्पी हे हाऊस बोट क्रूझसाठी सुद्धा ओळखले जाते. हाऊसबोटीवर कमीत कमी 3 लोक असतात ते पर्यटकांची काळजी घेतात. अलेप्पी येथील नेहरू ट्रॉफी स्नेक बोट रेस देशभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. ही शर्यत दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ओणम सणानिमित्त आयोजित केली जाते. या बोटीच्या शर्यतीत 100 ते 120 फूट लांबीच्या कानोसारख्या बोटीचा वापर केला जातो, यामध्ये एकाच वेळी अनेकजण बसतात.

Yercaud

२) येरकौड (Yercaud) –

येरकौड हे पर्यटनस्थळ तामिळनाडूमध्ये असून भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आणि वीकेंड गेटवेपैकी एक आहे. या हिल स्टेशनचे नाव त्याच्या मध्यभागी असलेल्या येरकौड तलावावरून पडले. येरी म्हणजे तमिळमधील सरोवर आणि काडू म्हणजे जंगल. खास करून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. येरकौड मध्ये आल्यावर तुम्ही येरकौड तलाव, लेडीज सीट, शेवरॉय मंदिर, पॅगोडा पॉइंट, किलियुर फॉल्स आणि बोटॅनिकल गार्डन या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

Barkana Falls, Agumbe

 

३) बरकाना धबधबा, अगुंबे (Barkana Falls, Agumbe) –

पावसाळ्यात उंचावरून येणारा धबधबा पाहायला कोणाला नाही आवडणार. दक्षिण भारतातील बरकाना धबधबा पाहून तुमचेही मन भरेल. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे गावाजवळील बलेहल्ली जंगल परिसरात असलेला हा धबधबा भारतातील 10 वा सर्वात उंच धबधबा आहे. बरकाना धबधबा 800 फूट उंचीवरून खाली पडतो. खास करून पावसाळ्यात जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढतो आणि हा धबधबा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात खाली वाहतो तेव्हा आणखी आकर्षक बनतो. त्यामुळे येथील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Munnar

४) मुन्नार (Munnar) – Monsoon Tourism

दक्षिण भारतातील सर्वोत्तम हिल स्टेशनपैकी एक असलेलं मुन्नार हे पर्यटन स्थळ केरळ राज्यात येत. मनमोहक स्थलाकृतिसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण नैसर्गिक आणि मानवनिर्मित सौंदर्याचे परिपूर्ण मिश्रण आहे. त्यातही पावसाळयात याठिकाणी येत म्हणजे आणखीनच बेस्ट ठरत. उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात मुन्नारला भेट देणं हे स्वरापेक्षा काय कमी नाही. याठिकाणी असलेलं दाट धुके आणि हवेतील मसाल्यांनी मिसळलेल्या कॉफीचा सुगंध घेऊन तुमचं मन फ्रेश होईल. मुन्नारमध्ये पावसाळ्यात तुम्ही बोटिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. मुन्नार व्हॅलीच्या हिरवाईमध्ये असलेल्या कुंडला तलावात बोटीतून प्रवास करण्याची मजा काही औरच आहे.

Ooty

५) उटी (Ooty)-

उटी हे दखनी भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते तामिळनाडू राज्यात येत. हे शहर इथल्या रोमँटिक वातावरणासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. हिरवळ आणि आल्हाददायक वातावरणाने नटलेल्या या शहराला ‘हिल स्टेशन्सची राणी’ असेही म्हंटल जाते. उटीमध्ये पर्यटकांसाठी भरपूर प्रेक्षणीय स्थळे आणि नौकाविहार आणि ट्रेकिंगच्या संधी मिळतात. उटीमध्ये तुम्ही बोटॅनिकल गार्डन्स, कॅथरीन, कलहट्टी आणि पायकारा धबधबे, ऊटी तलाव, एमराल्ड लेक, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान या ठिकाणांना भेट देऊन आपली निसर्गाचा आनंद घेऊ शकता.