Monsoon Tourism : पावसाळ्यात निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय? लोणावळ्यातील ‘या’ Top 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि मुंबई पासून जवळ असलेले आणि पश्चिम घाटातील सह्याद्री रांगेत वसलेले लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात. धबधबे, तलाव आणि डोंगररांगा, आणि हिल स्टेशन अशा निसर्ग सौंदर्यानी नटलेलं हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळ्याला येत असताना आणि येथील नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेत असतात. खास करून पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon Tourism) पर्यटकांची पाऊले आपोआपच लोणावळ्याच्या दिशेला वळतात. सध्या महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली असून तुम्ही सुद्धा लोणावळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला लोणावळ्यातील अशा ५ ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जेथे जाऊन तुम्ही आरामात वनडे ट्रिप करू शकता.

Bhushi Dam
Bhushi Dam

१) भुशी डॅम (Bhushi Dam) –

लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे भुशी डॅम… इंद्रायणी नदीवरील दगडी बांधकाम असलेले हे एक प्रसिद्ध धरण आहे. खास करून पावसाळ्यात (Monsoon Tourism) आणि विकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. भुशी डॅम परिसरात पोहण्यास मनाई आहे, परंतु पायऱ्यांवर बसून मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक नेहमीच घेत असतात. भुशी डॅमचे पाणी पायऱ्यांवरून वाहत खडकाळ परदेशातून मार्गक्रमण करत असताना मनाला वेगळाच आनंद मिळतो. याठिकाणी पर्यटकांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असती कि उभं राहायला पण कधी कधी जागा पुरत नाही.

Pavana Lake
Pavana Lake

२) पवना लेक (Pavana Lake) –

लोणावळा रेल्वे स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर असलेलला पवना तलाव हे सुद्धा पर्यटनाचे प्रसिद्ध असं ठिकाण आहे. निसर्ग आणि आल्हाददायक वातावरणाच्या सानिध्यात राहण्यासाठी हे पर्यटन स्थळ बेस्ट आहे. खास करून पावसाळ्यात पवना लेक परिसराला भेट देऊन सर्वत्र असलेल्या हिरवाईचा आनंद लुटता येतो. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पवना लेकला येऊन बोटींग, गेम्स, डिजे म्युझिक, लेक स्विमिंगचा आनंद घेऊ शकता.

Kune Falls
Kune Falls

 

३) कुणे धबधबा (Kune Falls) –

लोणावळा ते खंडाळा पासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारा कुणे धबधबा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखलं जाते. सह्याद्री पर्वतांच्या कुशीत ६२२ मीटर उंचीवर असलेला हा धबधबा देशातील १४ वा सर्वात मोठा धबधबा मानला जातो. (Monsoon Tourism) पावसाळाच्या दिवसात अनेक पर्यटकांची पाऊले कुणे धबधब्याकडे वळतात. जसा जसा पाऊस वाढत जातो, तस तस या परिसरातील मनमोहक दृश्य अधिकच खुलून येते. कुणे धबधब्याच्या थंडगार पाण्यात उतरून तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता. याशिवाय इथे झिपलायनिंग आणि रॅपलिंगसारख्या साहसी क्रिडाप्रकारांची मजा घेता येते.

Valvan Dam
Valvan Dam

४) वळवण धरण (Valvan Dam)- Monsoon Tourism

अंदाजे २६.४ मीटर उंचीवर असलेले आणि १३५६ मीटर पसरलेले, वळवण धरण हे त्याच्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांचे मुख्य केंद्र आहे. हे धारण कुंडली नदीवर बांधण्यात आलं असून खोपोली पॉवर स्टेशनवर वीज निर्मितीसाठी पाण्याचे स्त्रोत म्हणून ओळखले जाते. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांचा मोर्चा वळवण धरणाकडे जातो. पावसाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी पूर्ण झाली कि वळवण डॅम ला भेट देणे अतिशय सर्वोत्तम वेळ असते.

Wet n Joy Water Park
Wet n Joy Water Park

५) वेट एन जॉय वॉटर पार्क (Wet n Joy Water Park) –

लोणावळ्यातील जुने मुंबई पुणे महामार्गावर असलेलं वेट एन जॉय वॉटर पार्क हे सर्वात प्रसिद्ध वॉटरपार्क आहे. हे वॉटर पार्क सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. वेट एन जॉय वॉटर पार्कमध्ये लहान मुलांसाठी ८०० आणि जेष्ठ व्यक्तींसाठी १००० रुपयांपर्यंत तिकीटदर आकारण्यात येईल. आयुष्यातील सर्व दुःखे विसरून फुल एन्जॉय, मजा, उत्साह आणि अंगात जोश आणण्यासाठी या वॉटरपार्कला भेट देणं नक्कीच बेस्ट ठरेल. रोजच्या दगदगीतून सुटका करण्यासाठी एक दिवस तरी या वॉटरपार्कला जाऊन तुम्ही मनसोक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करा.