Monsoon Tourism : भारतातील ‘ही’ ठिकाणे तुम्हाला करुन देतील स्वर्गात आल्याची जाणीव; पावसाळ्यात नक्की भेट द्या

Monsoon Tourism Top Places In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon Tourism । सध्या संपूर्ण देशात मान्सून सुरु असून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळा सुरु झाला कि आपल्या सर्वांना कुठे ना कुठे फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत जाऊन आनंद घ्यावा असं आपणास वाटत असत. नैसर्गिक सौंदर्याने आणि विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत कि तिथे पावसाळ्यात गेल्यानंतर पुन्हा परत कधीच घरी येऊ वाटत नाही. त्यामुळे आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत. जिथे तुम्हाला नक्की फिरायला जायला आवडेल. चला आपण जाणून घेऊयात.

१) मुन्नार (Munnar) –

सगळ्यात पहिले ठिकाण म्हणजे केरळमधील मुन्नार शहर. मुन्नार हे एक हिल्स स्टेशन म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. इथल्या कुंडली, मधुरपुझा आणि नल्लाथन्नी या तीन नद्या मुन्नारच्या सौंदर्यात आणखीन भर पाडतात. तसेच इथली हिरवीगार झाडी थंड वातावरण आपल्याला प्रसन्न करुन टाकते. त्यामुळे मुन्नार हे फिरण्यासाठी सर्वांत सुंदर शहर आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण चांगलंच प्रसिद्ध आहे.

Munnar
Munnar

२) लडाख (Ladakh) – Monsoon Tourism

पुढचे शहर म्हणजे लडाख. लडाख हे शहर विविध वैशिष्ट्यांमुळे नटलेले आहे. लडाखला जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला कुठे जायचे असेल तर लडाख सर्वात बेस्ट पर्याय आहे. लडाखमधील नद्या, मंदीरे, उंच डोंगर आपल्याला मंत्रमुग्ध करुन टाकतात. तसेच तिथले प्रसन्न वातावरण मनात एक वेगळीच भूल निर्माण करते. खास करून पावसाळ्यात (Monsoon Tourism) याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Ladakh
Ladakh

3) कोडईकनाल (Kodaikanal)-

तमिळनाडूतील कोडईकनाल हे मनमोहीत करणारे शहर आहे. मुख्य म्हणजे हे शहर बायको किंवा गर्लफेंन्डला फिरायला घेऊन जाण्यासाठी सर्वांत उत्तम आहे. या शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील खूप मोठी आहे. थंडगार वातावरण, उंच डोंगर, घरे इथली खास ओळख आहे. त्यामुळे हे ठिकाणी फिरण्यासाठी सर्वांत जास्त चांगला पर्याय आहे.

Kodaikanal
Kodaikanal

4) अंबोली (Amboli) –

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील अंबोली हे ठिकाण देखील पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी सुंदर आहे. इथे आल्यावर आपल्याला फक्त  हिरवी झाडी आणि धबधबे पाहिला मिळतील. समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर अंबोली ठिकाम आहे. याच्या आजूबाजूला देखील इतर अनेक पर्यटन स्थळेे असल्यामुळे त्या ठिकाणी देखील जायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यात (Monsoon Tourism) नक्की याठिकाणी भेट द्यावी.

Amboli
Amboli

5) माजुली (Majuli) –

आसाम येथील माजुली हे कुटुंबासोबत जाण्यासाठी सर्वांत बेस्ट प्लेस आहे. आसामधील जोरहाट जिल्हा हा जगातील सर्वात मोठा नदीचा बेट आहे. त्यामुळे पावसाळ्यात इथले सौंदर्य खूपच मोहक असते. आसामच्या सौंदर्यसृष्टीबाबत आपल्याला माहितच आहे. याच कारणाने आसाम नेहमीच सर्वांत सुंदर पर्यटन स्थळ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे पावसाळ्यात माजुलीला जाऊन आनंद घेणं तुम्हाला नवा अनुभव देईल.

Majuli
Majuli

दरम्यान भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे गेल्यावर आपल्याल स्वर्गात आल्याची जाणीव होती. आता पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पर्यटन स्थळावरील हॉटेलचे तसेच खाण्याचे दर देखील परवडणारे असतात. त्यामुळे हा काळ बाहेर फिरण्यासाठी आपल्या खिश्याला देखील परवडणारा असतो.