Monsoon Update | आपल्या भारतीय हवामान खाते हे हवामानाविषयी नेहमीच त्यांचे अंदाज व्यक्त करत असतात. आणि ते अंदाज खरे देखील ठरत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर अनेक ठिकाणी आपल्याला कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 19 मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. त्याचप्रमाणे 31 मे रोजी मान्सून (Monsoon Update) केरळमध्ये देखील दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता शेतकऱ्यांना देखील शेतीच्या कामांसाठी घाई करायला पाहिजे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला | Monsoon Update
मे महिना सुरू झाला की, सगळेजण नैऋत्य मान्सूनची वाट पाहत असतात. यंदा मान्सून अंदमान आणि निकोबार या बेटावर वेळेआधीच येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. 19 मे ही अंदाजे तारीख सांगितली होती आणि त्याच दिवशी अंदमान मालदीव आणि कोरोमोनीच्या काही भागात पाऊस दाखल झालेला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात देखील मान्सून पोहोचलेला आहे. याबाबतचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे अंदमानमध्ये 22 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. परंतु या वर्षी तो तीन दिवस आधी दाखल झालेला आहे
केरळमध्ये पुढील दहा दिवसात पाऊस येणार
अंदमान आणि निकोबारमध्ये पाऊस पडल्यावर त्याची वाटचाल केरळकडे होत असते. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली, तर 31 मे पर्यंत मानसून केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
19 आणि 20 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस हा केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार प्रमाणात पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नैऋत्य मान्सून हा 21 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी देखील केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.