Moonland of Ladakh | जमिनीवरच राहून करा चंद्राची सैर; भारतातील हे ठिकाण देईल बेस्ट अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Moonland of Ladakh जे लोक एडवेंचर करतात. ते नेहमीच नवनवीन ठिकाणांना भेट देत असतात आणि तेथे जाऊन तेथील माहिती घेऊन एडवेंचर करत असतात. एडवेंचर करणाऱ्या लोकांसाठी लेह आणि लडाख हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. लेह आणि लडाखमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही एडवेंचर करू शकता. सोशल मीडियावर देखील या ठिकाणचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आपण पँगॉन्ग लेक, मॅग्नेटिक हिल, लेह पॅलेस आणि चादर ट्रॅक या ठिकाणचे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत. परंतु लेह आणि लडाखमधील एक गोष्ट अनेकांना माहित नाही. ती म्हणजे येथील एका छोट्याश्या गावात भारताची चंद्रभूमी लपलेली आहे. लेहपासून 130 किलोमीटर अंतरावर लामायुरू नावाचे एक गाव आहे. त्या गावाला भारताची चंद्रभूमी ( Moonland of Ladakh) असे देखील म्हटलेले आहे. आता याच ठिकाणाबद्दल नवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

हे ठिकाण मून लँड म्हणून प्रसिद्ध आहे |  Moonland of Ladakh

लेहपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेले हे लामायुरू गाव मुन लॅंड म्हणून ओळखले जाते. या संबंधात शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, या ठिकाणी ना झाडी आहे, ना वारा आहे, ना डोंगर आहे. त्यामुळे या ठिकाणाला लडाखची चंद्रभूमी असे देखील म्हटले जाते.

पूर्वी येथे तलाव असायचा

वैज्ञानिकांनी सांगितलेले आहे की, लडाखचा हा भाग पूर्वीपासूनच असा नाही. 30 ते 40 वर्षांपूर्वी या ठिकाणी एक मोठा तलाव होता. ज्याचे पाणी हळूहळू संपले. परंतु तलावातील मानवी तशीच साठवून राहिली. आणि हळूहळू या ठिकाणी संपूर्ण मोकळे झाले. त्यामुळे तिथे गेल्यावर आपल्याला चंद्राची आठवण येते. म्हणूनच या भागाला लडाखची चंद्रभूमी असे देखील म्हटले जाते.