नवी दिल्ली । आतापर्यंत, नवीन इन्कम टॅक्स पोर्टलद्वारे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटींपेक्षा जास्त इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले गेले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितले की,”आता नवीन आयटी पोर्टलशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले आहे.” हे देखील सांगितले की सर्व ITR ई-फाइलिंगसाठी उपलब्ध केले गेले आहेत.
1.70 कोटी ITR ची ई-पडताळणी झाली
CBDT ने म्हटले आहे की, 2021-22 आर्थिक वर्षासाठी नवीन पोर्टलवर दाखल केलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त ITR मध्ये ITR -1 आणि 4 चा वाटा 86 टक्के आहेत. यापैकी 1.70 कोटीहून अधिक रिटर्न चे ई-पडताळणी देखील करण्यात आले आहे. यापैकी 1.49 कोटी रिटर्न आधार कार्ड आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे व्हेरिफाय करण्यात आले आहेत.आधार कार्ड OTP आणि इतर पद्धतींद्वारे ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया विभागाला ITR ची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि रिफंड जारी करण्यासाठी आवश्यक आहे.
36 लाखांहून अधिक रिफंड जारी केला
व्हॅरिफाइड ITR-1 आणि 4 पैकी 1.06 कोटीहून अधिक ITR वर प्रक्रिया करण्यात आली आहे. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी 36.22 लाखांहून अधिक रिफंड जारी करण्यात आला आहे. ITR-2 आणि 3 ची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. नवीन पोर्टल 7 जून 2021 रोजी सुरू करण्यात आले आणि सुरुवातीच्या काळात करदात्यांनी पोर्टलच्या कामकाजात अनियमितता नोंदवली होती. CBDT ने सांगितले की अनेक तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत आणि पोर्टलची कामगिरी बऱ्याच प्रमाणात स्थिर झाली आहे. बोर्डाने सांगितले की, 13 ऑक्टोबरपर्यंत 13.44 कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी लॉग इन केले आहे आणि सुमारे 54.70 लाख करदात्यांनी त्यांचे पासवर्ड पुन्हा मिळवण्याची सुविधा घेतली आहे.