हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता त्यात मोबाईल हा एक मूलभूत गरजांपैकी एक झालेला आहे. आज काल देशातील प्रत्येक नागरिक हा मोबाईल वापरत असतो. आणि मोबाईलवर जास्त वेळ तर सोशल मीडियावर घालवत असतो. त्यामुळे लोकांच्या बौद्धिक पातळीत फरक जाणवायला लागलेला आहे. लोकांच्या शरीरात आजकाल डोपामाईन या हार्मोनची पातळी वाढत आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे डोपामाईन नक्की काय आहे? डोपामाईन (Dopamine) हे एक प्रकारचे रसायन आहे. जे आपले मेंदूमध्ये असतं. आपल्या आनंदी ठेवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी हे रसायनिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु डोपामाईनचे जास्त प्रमाण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.
डोपामाईन म्हणजे काय ?
डोपामाईन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. जे आपल्या मेंदूमध्ये असते हे रसायन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. त्यामुळे आपल्याला आनंद होतो सोशल मीडिया वापरल्याने व्हिडिओ गेम्स खेळल्याने व्यक्तीच्या मेंदूत हे डोपामाईन सक्रिय होते. त्यामुळे व्यक्तीला त्याच त्याच गोष्टी पुन्हा करूशी वाटतात. म्हणून जास्त लोकांनी डोपामाईन देखील धोकादायक असते.
आरोग्यासाठी हानिकारक डोपामाईन हे शरीरासाठी चांगले आहे. परंतु जर त्याचा अतिरेक झाले, तर ते शरीरासाठी हानिकारक होऊ शकते. तसेच तो मानसिक दृष्ट्या कमजोर देखील होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा व्यसनामुळे माणूस आपला स्वभाव गमावू शकतो तर चिडचिड करतो.
सोशल मीडियामुळे वाढते डोपामाईन प्रमाण
आज-काल सोशल मीडियावर लोक जास्त सक्रिय असतात. सोशल मीडिया वापरायला सगळ्यांनाच आवडते
त्यामुळे मेंदूमध्ये डोपामाईन हे हार्मोन सोडले जाते. डोपामाईन हे हार्मोन सोडल्यामुळे लोकांचा संयम देखील कमी होत चाललेला आहे. जगातील जवळपास 20 दशलक्ष लोक सोशल मीडियाच्या व्यसनाने ग्रस्त आहेत. हे टाळण्यासाठी अनेक लोक डोपामाईन डिटॉक्स देखील अवलंब करत आहे.
डोपामाइन डिटॉक्स कसे करावे
डोपामाइन हिटची निवड- लोकांना अशा क्रियाकलापांकडे लक्ष द्यावे लागते ज्यामुळे डोपामाइन लवकर बाहेर पडतात. सोशल मीडिया, तासनतास गेम खेळणे, जंक फूडचे सेवन करणे, अशा गोष्टींमुळे डोपामाइन लगेच बाहेर पडतात. त्यामुळेच डिटॉक्ससाठी या सर्व गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे.
मर्यादा सेट करा – जर तुम्ही पहिल्यांदाच डोपामाइन डिटॉक्स करत असाल, तर दिवसाच्या सुरुवातीला आणि झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी डोपामाइन लवकर सोडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.
कमी-डोपामाइन क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा – डोपामाइन डिटॉक्ससाठी, आपण कमी डोपामाइन सोडणाऱ्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामध्ये पुस्तके वाचणे, ध्यानधारणा, बागकाम यासारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. असे केल्याने तुम्ही डोपामाइन देखील डिटॉक्स करू शकता.