औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) येत्या 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते जोरदार तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत चालावे लागणार असल्याने अनेक काँग्रेसचे नेते सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत. आज पहाटेच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार कल्याण काळे यांनी विद्यापीठात मॉर्निंग वॉक केलं.
या यात्रेआगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (bharat jodo yatra) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नांदेड, हिंगोली, शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ते आवाहन नाना पटोले यांच्याकडून करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रा आपल्यासाठी एक संधी आहे. या संधीचं सोनं करा. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे या भावनेतून प्रत्येकाने काम करा. त्यामुळे पक्ष वाढण्यास मदत होईल असेदेखील ते यावेळी म्हणाले
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) तामिळनाडूपासून कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत यात्रेला सर्वाधिक प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला किती प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!