बाप रे!! मुंबईतील सर्वात महाग दुकान; दिवसाला द्यावं लागतंय 10 लाख रुपये भाडं

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इस्माइल इमारतीमध्ये जगप्रसिद्ध फॅशन ब्रॅण्ड ‘झारा’चं स्टोअर बंद झाल्यानंतर, त्याच्या जागी आता लक्झरी फॅशन ब्रॅण्ड ‘पर्पल स्टाइल लॅब्स’ने प्रवेश केला आहे. ही इमारत 118 वर्षांपूर्वीची आहे आणि ती फ्लोरा फाऊंट येथे स्थित आहे. ‘पर्पल स्टाइल लॅब्स’ने या जागेचा पाच वर्षांचा करार केला असून, त्यासाठी दिवसाला 10 लाख रुपये भाडं देणार आहेत. म्हणजेच एकूण भाड्याची रक्कम या करारानुसार 206 कोटी रुपये होईल.

‘पर्पल स्टाइल लॅब्स’ची स्टोअर्स –

‘पर्पल स्टाइल लॅब्स’ची स्थापना अभिषेक अग्रवाल यांनी 2015 मध्ये केली आहे. हा ब्रॅण्ड महागडे कपडे विकण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या ‘प्रिनियाज पॉप-अप शॉप’ ब्रँडनेम अंतर्गत कपडे विकतात. सध्या ‘पर्पल स्टाइल लॅब्स’ची स्टोअर्स जुहू आणि वांद्रे येथे आहेत. या नव्या जागेसाठी ‘पर्पल स्टाइल लॅब्स’ने 18 कोटी रुपयांचं डिपॉझिट दिलं आहे आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून 53 लाख रुपये भरले आहेत.

जागा 59 हजार 350 स्वेअर फूट –

‘पर्पल स्टाइल लॅब्स’ने भाड्याने घेतलेली जागा 59 हजार 350 स्वेअर फूट इतकी आहे. या जागेसाठी महिन्याला 3 कोटी रुपये भाडं दिलं जाणार आहे. या करारात भाड्याची रक्कम दरवर्षी वाढणार आहे; दुसऱ्या वर्षी 39 कोटी, तिसऱ्या वर्षी 42 कोटी, चौथ्या वर्षी 43.8 कोटी आणि पाचव्या वर्षी 45.6 कोटी रुपये भाडं मोजावं लागणार आहे.

‘झारा’ स्टोअर बंद –

‘झारा’ने या ठिकाणी 9 वर्षांपासून स्टोअर चालवलं होतं, मात्र भाड्याची रक्कम परवडेनासी झाल्याने त्यांनी स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘झारा’ने 2016 मध्ये 21 वर्षांचा करार केला होता, मात्र तो मोडत काढत स्टोअर बंद केलं.