अभ्यास करत नाही या रागातून आईने केला 3 वर्षांच्या मुलाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण नाशिक हादरले आहे. यामध्ये एका महिलेनं आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून करुन स्वतः आत्महत्या केली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. या आईचे नाव शिखा पाठक तर मुलाचे नाव रिधान पाठक आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याचा राग आल्यानं आईने हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पाथर्डी फाटा येथील साई सिद्धी अपार्टमेंट ही घटना घडली आहे. 32 वर्षीय शिखा सागर पाठक यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई- वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करुन त्यांनी आत्महत्या केली आहे.

यानंतर मुलगी बराच वेळ उघडत नसल्यानं आईवडिलांना संशय आला म्हणून त्यांनी आपल्या जावयाला बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांनी दार उघडल असता या महिलेने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. तसेच या महिलेसोबत तिच्या मुलाचादेखील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर ,पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले. यावेळी मृतदेहाच्या शेजारी एक सुसाईड नोट आढळून आली आहे.

Leave a Comment