सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वाई तालुक्यातील एका गावात गुरुवारी रात्री मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाच दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेने नात्याला काळीमा फासला गेल्याने संशयिताविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेतील पीडित महिला तिच्या पतीसोबत एका लग्नाचा कार्यक्रम असल्याने तिकडे गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर महिला एकटीच घरी पुढे आली. यावेळी तिचा मुलगा हा घराच्या ओट्यावर बसला होता. संशयिताची आई घरात गेल्यानंतर संशयित घरात गेला व त्याने आतून कढी लावली. यावेळी त्याने जबरदस्तीने आईवर बलात्कार केला.
आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरातील शेजारी तेथे जमा झाली. यानंतर त्यांनी संशयिताच्या वडिलांना याची माहिती दिली. त्याच्या वडिलाने यामध्ये हस्तक्षेप केला असता त्याने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. घडलेल्या घटने नंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती ऐकून पोलिस ही हादरून गेले. संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.