Motorola Moto E13 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा जबरदस्त फोन भारतीय बाजारपेठेत दाखल, असे असतील फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola Moto E13 : Motorola या स्मार्टफोन कंपनीकडून नुकताच आपला नवीन Moto E13 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Motorola Moto E13 हा एक एंट्री-लेव्हल फोन आहे. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये HD+ डिस्प्ले आणि जबरदस्त बॅटरीबॅकअप दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रीमी व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे. Motorola Moto E13 च्या 2GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे तर 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे.

Motorola Moto E13 Review: 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बैटरी के साथ आया सस्ता  स्मार्टफोन, कीमत आपकी उम्मीद से कम - Deoghar News

हे जाणून घ्या कि, 15 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर याच्या विक्रीस सुरूवात होईल. या फोनसोबत Jio लॉक ऑफर देखील देण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राहकांनी हा फोन खरेदी केल्याच्या 15 दिवसांच्या आत यामध्ये JioSIM घातल्यास 700 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळू शकेल.

लो भाई! लांच हो गया Motorola E13 स्मार्टफोन, 10,600 रुपए में कंपनी दे रही  ढेर सारे धांसू फीचर्स-The Vocal News Hindi

कनेक्टिव्हिटी बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 2.4GHz आणि 5GHz Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS आणि GLONASS सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ऑडिओसाठी 3.5 मिमी जॅक दिला गेला आहे. Android 13 Go Edition OS वर काम करणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन ड्युअल नॅनो सिम सपोर्ट असलेला 4G हँडसेट आहे. या स्मार्टफोनला IP52 रेटिंग मिळाले आहे

low budget smartphone Moto E13 listed on geekbench Specifications leaked  before launch

Motorola Moto E13 फोनमध्ये 720 x 1600 पिक्सेलच्या HD + रिझोल्यूशनसह 6.5-इंच वॉटर-ड्रॉप नॉच पॅनेल देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये आयपीएस एलसीडी पॅनल देखील उपलब्ध आहे. तसेच या फोनच्या मागील बाजूबरोबरच समोरील बाजूस सिंगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13MP मुख्य लेन्सचा समावेश आहे. जी फेस डिटेक्शन ऑटोफोकसला सपोर्ट करेल. यासोबतच सेल्फीसाठी 5MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Motorola moto e13 Launched In India With Android 13 And Octa-Core Chipset:  Check Price, Specifications Here

यामध्ये Mali-G67 MP1 GPU आणि Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 2GB/4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये 1TB पर्यंत अतिरिक्त स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील उपलब्ध आहे. Motorola Moto E13

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.googleadservices.com/pagead/aclk?sa=L&ai=DChcSEwifhKPW8YX9AhVhmWYCHTb-AgQYABAAGgJzbQ&ohost=www.google.com&cid=CAESauD2WzP_auu9tn285lko2L-Dy5d6k-

हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा