हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फारच कमी वाढ झाली. शुक्रवारच्या एक्सपायरीपर्यंत सेन्सेक्स 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52907 वर बंद झाला तर निफ्टी 0.33 टक्क्यांनी वाढून 15752 वर पोहोचला. पूर्ण जून महिन्याबाबत बोलायचे झाल्यास सेन्सेक्स 4.5 टक्क्यांनी तर निफ्टी 4.8 टक्क्यांनी घसरला.
गेल्या आठवड्यात बाजारात रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. याशिवाय परकीय गुंतवणूकदारांकडून झालेली विक्री, पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्क आणि जागतिक संकेत ढासळल्यामुळे बाजारावर दबाव राहिला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारातून 6836.71 कोटी रुपये काढून घेतले. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी याच कालावधीत 5926 कोटी रुपयांची खरेदी केली. जून महिन्यात, FII कडून 58112 कोटी रुपयांची विक्री झाली तर DII ने 46599 कोटी रुपयांची बाजारात विक्री केली. Share Market
रुपया विक्रमी नीचांकी पातळी
गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाने 79 ची पातळी ओलांडून आपला सर्वकालीन नीचांक गाठला. रुपयाने 79.11 हा नवा नीचांक गाठला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस डॉलरच्या तुलनेत रुपया 79.04 वर बंद झाला. Share Market
बाजाराची दिशा
सॅमको सिक्युरिटीजच्या येशा शाह म्हणतात की,” पुढील आठवडाभरही अस्थिरता कायम राहील. 15930 हा निफ्टीसाठी मोठा ब्रेक मानला जातो आणि बाजाराला अल्पकालीन नफ्यासाठी हा अडथळा तोडावा लागेल.” तांत्रिक विश्लेषक मनीष शाह यांनीही म्हटले आहे की, मोठ्या रॅलीसाठी निफ्टीला 15950-16000 च्या रेंजमधून बाहेर पडावे लागेल. त्या एकदा निफ्टी 16000 च्या पुढे गेला की मगच आक्रमक खरेदी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.” Share Market
शेअरखानचे गौरव रत्नपानी सांगतात की,”गेल्या आठवड्यात बाजाराची सुरुवात चांगली झाली होती, मात्र ते जास्त काळ टिकवून ठेवता आली नाही. जर निफ्टी 15900-15600 च्या रेंजमध्ये गेला तर विक्री दिसून येईल. तसेच 15600-15500 च्या दरम्यान गेल्यास गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळेल. तसेच निफ्टी 15500-15900 च्या रेंजमध्ये असेल असे त्यांचे म्हणणे आहे. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या
Gold Price : गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!
आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!