प्रतिनिधी पुणे : स्त्री शिक्षणाचे द्वार खुले करणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्राबाई फुले यांचे जीवन आता लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. आनंदी गोपाळ चित्रपट बनवणारे दिग्दर्शक समीर विद्वांस हे शिवधनुष्य उचलणार
समीर विद्वांस यांनीच फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी असं लिहिलं आहे “आनंदीगोपाळ च्या वेळी खूप सारं वाचताना एक गोष्ट परत परत जाणवत राहिली की आपल्याला इतिहास नीट शिकवलाच गेला नाही. सनसनावळ्यात अडकून राहिलो पण अनेक थोर व्यक्तिमत्वांशी आपली ओळख करूनच दिली नाहिये. त्यातलेच एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांचं आयुष्य मी नीट वाचलं आणि मी हेलावून गेलो.आणि तेव्हाच मनात ठरवलं की आपण जर आनंदीगोपाळ ची गाथा सांगत असू तर ज्योतिबासावित्रीची गाथा सांगायलाच हवी होती, कधीच. पण उशीर झाला असं काही नाही. मी स्वत:लाच एक वचन दिलंय की मी ज्योतिबासावित्री (विशेषत: सावित्रीबाईंची) गाथा सांगणारच. लगेच नाही. थोड्या काळाने. पण काम सुरू करायला काय हरकत आहे?! मी काम सुरू केलंय. थोडा वेळ लागेल. अशीच दोन एक वर्ष. वर्तमानात वावरतो आधी… पण मी ‘सावित्री’ ची कथा सांगणार हे नक्की.”
महत्वाचे म्हणजे समीर विद्वांस यांच्या आनंदी गोपाळ या मराठमोळ्या चित्रपटाला उत्तम यश मिळत आहे आणि आता ते हा चित्रपट आणायची चर्चा करत असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.




