नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी भाजपच्या एका आमदार महाशयांनी अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदतीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था सोनू करत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी सोनू सूद याच्याकडे मदत मागितल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
विरोधकांनी शुक्ला यांना चांगलाच फैलावर घेतलं असून मध्य प्रदेश आणि केंद्रात भाजपाची सत्ता असताना भाजप आमदाराला एका अभिनेत्याकडे मदतीसाठी जावे लागणं ही एक लाजिरवाणी बाब असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे.भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशच्या रीवा आणि सतना जिल्ह्यातील रहिवाशांची एक यादी बनवून ट्विट केली. या ट्विटमध्ये त्यांनी सोनू सूदकडे मदत मागताना ‘मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकलेले आहेत आणि अजूनही आपल्या घरी पपरतू शकलेले नाहीत. कृपया यांना पोहचवण्यासाठी आमची मदत करा’ असं म्हटलं होतं.
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आमदार महाशयांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राजेंद्र शुक्ला यांच्या या ट्विटवर अलका लांबा यांनी ‘देशात आणि राज्यात यांच्याच पक्षाचं सरकार असूनही हे सोनू सूदकडे मदतीची मागणी करत आहेत’ असं म्हणत टीका केली आहे. इतकंच नाही तर राजीनामा देऊन टाकण्याचा सल्लाही अलका लांबा यांनी आमदार महाशयांना देऊन टाकला.
आँखों पर यक़ीन नहीं होता कि जो खुद विधायक और पूर्व में मंत्री भी रहा,
मध्यप्रदेश और देश में इन्हीं की सरकार है,
CM/PMइन्हीं की पार्टी के हैं, महाराष्ट्र में भी इनके सांसद और विधायक हैं, फिर भी मदद @SonuSood से माँग रहे हैं,
थोड़ी भी शर्म हो तो इस्तीफ़ा देकर घर बैठ जाओ,बेहतर होगा. pic.twitter.com/3Ee60oMa5c— Alka Lamba ???????????? (@LambaAlka) June 2, 2020
शुक्ला यांच्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत अलका लांबा यांनी लिहिलंय ‘डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जे स्वत: आमदार आहेत आणि माजी मंत्रीही राहिलेत, मध्य प्रदेशात आणि देशात यांचंच सरकार आहे, मुख्यमंत्री / पंतप्रधान यांच्याच पक्षाचे आहेत, महाराष्ट्रातही यांचे खासदार आणि आमदार आहेत. तरीदेखील हे मदत सोनू सूदकडे मागत आहेत. थोडी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन घरी बसा, चांगलं होईल’. दरम्यान, शुक्ला यांच्या मदतीच्या मागणीवर सोनूनंही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.
Sir, अब कोई भई कहीं नहीं फँसेगा। आपके प्रवासी भाई कल आपके पास भेज देंगे सर???? कभी MP आया तो पोहा ज़रूर खिलाना। ❣️ https://t.co/dBZpfDiaxc
— sonu sood (@SonuSood) June 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”