मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे आज जाहीर करणार भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात एकच वादळ उठले आहे. संपूर्ण राज्यभर यामध्ये मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. अशातच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केला आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे  नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यामुळे संभाजी राजे आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षणासाठी वेगवेगळ्या घडामोडी घडतात एकीकडे राज्य सरकारने थेट राष्ट्रपतींकडे याबद्दल मागणी केली. तर केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे काय भाष्य करणार याकडे तमाम मराठा समाजाचे लक्ष लागून आहे. मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ट्विटवर छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे चर्चांना आता उधाण आलं आहे. उपसमित्या आणि विरोधकांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरही संभाजीराजे काय बोलणार हे बघणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment