औरंगाबाद | शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग गंभीर बनला आहे, अत्यंत गंभीर स्थिती बनली आहे. यावर नागरिकांचे लसीकरण हा एकमेव उपाय अत्यंत प्रभावी आहेत. त्या संदर्भात खासदार डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद शहरातील मध्य विभागांमध्ये 18 ठिकाणी लसीकरण केंद्रावर भेट देऊन, तेथील डॉक्टर, परिचारिका यांचे स्वागत व आभार तसेच लसीकरणाच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचे थैमान घातले असून संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दिवसाला पंधराशे ते अठराशे रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागांमध्ये देखील रुग्ण वाढ ही चिंताजनक आहे. पाचशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण, मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर असे उपाय प्रभावी आहेत. पण त्यात सर्वात प्रभावी उपाय लसीकरण आहे. यासंदर्भात राज्यसभेमध्ये देखील खासदार डॉ. भागवत कराड यांनी कोरोनाची साथ रोखायची असेल तर, प्रभावीपणे लसीकरण होणे आवश्यक आहेत. असा मुद्दा मांडला होता. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी देखील महाराष्ट्र राज्यामध्ये लसीकरण प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केल्या आहेत. लस कमी पडणार नाही तरी लसीकरण प्रभावी करण्याची गरज आहे.
औरंगाबादचा रुग्ण वाढीचा वेग जास्त आहेत, पण मृत्यूदर नियंत्रणात आहे. सध्या एकूण मृत्यूमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये संसर्गाची साखळी आणि नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर, प्रभावीपणे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये जनजागृतीचा भाग म्हणून लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी लसीकरण सुरू आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर कराड यांनी डॉक्टर परिचारिका नर्सेस यांचे स्वागत करून आभार मानले. त्यांनी स्वतः लसीकरण केंद्रावर जाऊन अनोखा कार्यक्रम सुरू केला आहे. याच बरोबर नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेली भीती आणि त्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यास संदर्भात पुढाकार घेतला आहेत. त्यांनी शहरातील मध्य भागामध्ये किमान 18 लसीकरण केंद्रावर भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत भाजपा शहराध्यक्ष संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी महापौर बापू घडामोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, सरचिटणीस राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, शहर उपाध्यक्ष महेश माळवतकर, लता दलाल जगदीश सिद्ध, भाजयुमो शहर अध्यक्ष राज वानखेडे, मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ साळवे सागर पाले, माजी सभापती भाऊसाहेब ताठे, व्यापारी आघाडी मराठवाडा संयोजक मुकेश जैन, सोमीनाथ देवकाते, संजय फतेलष्कर, शिवाजी इंजे, धनंजय पालोदकर, नीरज जैन, वंदना शहा, जानवी पाटील, प्रेम कलवले, व्यंकटेश जोशी, दीपक देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा