खासदार हेमंत पाटील यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल, लवकरच होणार अटक? डिनला स्वच्छतागृह साफ करायला लावणं अंगलट

Hemant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nanded News : डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी ३१ हुन अधिक रुग्णांचा मृत्यू (Nanded Deaths) झाल्याचे समोर आले आहे. औषंधाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयात नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश असल्याने या घटनेनंतर सरकारवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यांनतर आता शिवसेना खासदार हेमंत पाटील MP Hemant Patil) यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथे ३१ हुन अधिक पेशंटचा अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे मृत्यू झाल्यांनतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी पाटील यांनी स्वस्च्छतागृहांमधील अश्वछता पाहून थेट डीनकडूनच टॉयलेट साफ करून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वास्तविक घटनेला सरकारी धोरण जबाबदार असूनही खासदारांनी स्वतःची जबाबदारी झटकत स्टंटगिरी केल्यामुळे यावरून नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होत्या. आता हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

खा.हेमंत पाटील वर सकाळी ३५३ आणि ॲट्राॅसिटी ॲक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे काल तक्रार दिल्यानंतर आज सकाळी गुन्हा दाखल होतो. आता तरी प्रशासनाने हेमंत पाटीलला तात्काळ अटक करावी. हेमंत पाटीलला जो पर्यंत अटक होणार नाही, तो पर्यंत मी शांत बसणार नाही. हे प्रशासनाने लक्षात घ्यावे असा इशारा राहुल प्रधान यांनी दिला आहे.