औरंगाबाद । शहरात एतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण, रंगरंगोटी तसेच खाम नदी पुनरुज्जीकरण आणि अनेक महत्वाचे कामे सुरु आहे. यासाठी स्थानिक प्रशासनही जोमाने काम करत आहे. अनेक रस्त्याचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीकरणाचे कामे सुरु आहेत.लॉकडाऊनमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे वेगाने करण्यात आली.
तसेच औरंगाबाद शहरातील एतिहासिक बारापुल्ला दरवाजा येथील पुलाचे काम खाजदार इम्तियाज जलील यांच्या निधीतून झाले. ते काम पूर्ण झाल्य नंतर पुलाचे लोकार्पण खाजदार इम्तियाज जलील याच्या हस्ते झाले.
यावेळी खाजदार इम्तियाज जलील यांनी काम पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आणि एतिहासिक काम पूर्ण झाले असेही म्हंटले. गेल्या वीस वर्षांपासून हे काम रखडलेले होते. खाजदार इम्तियाज जलील यांनी हे काम पूर्ण केले. यावेळी बारापुल्ला परिसरातील नागरिक आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते उपस्तित होते.
पहा संपूर्ण उदघाटन
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/495136548388094/