खासदार जलील यांच्या हस्ते 53 नवीन चार्टर्ड अकाउंट्सचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आईसीएआयच्या औरंगाबाद शाखा आणि औरंगाबाद विकासातर्फे नव्याने झालेल्या 53 चार्टर्ड अकाऊंटट्सचा रविवारी (ता.३) खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा परिसरात असलेल्या आईसीएआय भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

औरंगाबादमधून 21 जुलैच्या 2021 परीक्षेत एकूण 53 विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले, असे औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए पंकज सोनी यांनी सांगितले. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, शहरातील प्रत्येक संभाव्य भागात वॉकिंग प्लाझा सारख्या तरुणांच्या मनोरंजनासाठी पुढाकार घेतले जाईल. आपल्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हा जीवनातील आणि राजकारणाच्या क्षेत्रात महत्त्वाचा घटक आहे, असे खासदार म्हणाले.

युवा महोत्सवात टॅलेंट सर्च, मिस्टर आणि मिस विकासा, नृत्य, गायन स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सीए यश जैन आणि सीए यांनी सूत्रसंचालन केले. तर मोहिता पाटील आभार मानले. यावेळी शाखेचे उपाध्यक्ष सीए योगेश अग्रवाल, शाखा सचिव सीए प्रवीण बांगड, शाखा कोषाध्यक्ष सीए गणेश भालेराव, विकास अध्यक्ष सीए रूपाली बोथरा आणि तत्कालीन माजी अध्यक्ष सीए गणेश शिलवंत उपस्थित होते.

Leave a Comment