मुंबई : अभिनेत्री आणि भाजपच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 31 मार्च रोजी खासदार खेर यांच्या अनुपस्थिती बाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सुद यांनी याबाबत उत्तर दिले. यावेळी त्यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याची माहिती दिली. बुधवारी 31 मार्च रोजी विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना अरुण सुद म्हणाले की, बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच आपल्या या आजाराबद्दल माहिती झालं होतं. उपचारानंतर आता त्या ठीक होत आहेत. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं ही सूद यांनी यावेळी सांगितलं. तसेच मुंबईत यांच्यावर उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले.
किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा आहे. हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. दरम्यान अभिनेत्री किरण खेर यांनी 1990 साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2009 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group