आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल – नवणीत राणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. खुद्द काँग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते तसेच पंतप्रधान पदासाठी देखील शरद पवार हेच उमेदवार असतील अशाही बातम्या पसरल्या होत्या. दरम्यान, अमरावती खासदार नवणीत राणा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत कौर राणा यांनी दिली आहे.

नवणीत राणा म्हणल्या,आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

दरम्यान,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही यावर भाष्य करताना म्हंटल होत की शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल. पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’