अमरावती । चार दिवस आधी खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
गुरुवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले.रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनीत राणा यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”