खा. प्रतापराव जाधव यांची बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून खा. प्रतापराव जाधव (MP Prataprav Jadhav) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनादेखील पक्षातून काढण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे हि माहिती देण्यात आली आहे.

तसेच खा. प्रतापराव जाधव (MP Prataprav Jadhav) यांच्या हकालपट्टीनंतर बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी वसंतराव भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाण्याचे खासदार व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव (MP Prataprav Jadhav) हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

तसेच खा. प्रतापराव जाधव (MP Prataprav Jadhav) यांच्यासोबत शिंदे गटात गेलेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील (विधानसभा मलकापूर, जळगाव जामोद), उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे, संजय अवताडे, नांदुरा तालुका प्रमुख संतोष डिवरे, मलकापूर तालुका प्रमुख विजय साठे, शेगाव तालुका प्रमुख रामा थारकार यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स पहा !!!

धक्कादायक ! चिखलातील ट्रॅक्टर काढताना ट्रॅक्टर चालकाचा चेंगरून मृत्यू

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री चे निधन

2000 टक्के रिटर्न देणाऱ्या ‘या’ कंपनीकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर !!!

एका पक्षाची 3 मते 21 कोटीत फुटली; मिटकरींचा रोख नेमका कोणावर??

गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या