बिपीन रावत यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते; संभाजीराजेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “जनरल बिपीन रावत हे आता आपल्यामधून निघून गेलेले आहेत. बिपीन रावत यांच्यावर शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणं चालणारे संस्कार होते. रावत यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते,” अशी जीनी आठवण संभाजी छत्रपती यांनी सांगितली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जनरल बिपीन रावत हे आता आपल्यामधून निघून गेलेले आहेत. माझ्यासाठी आणि ही देशासाठी मोठी हानी आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तीन वर्षा अगोदर व्यापक स्वरुपात दिल्लीत साजरी व्हावी म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांचं युद्ध तंत्र पाहिलं तर पाहुणे राष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि नौदल प्रमुख असावेत, असं मी त्यांना सांगितलं होत.

 

बिपीन रावत यांच्याशी मी भेटलो त्यावेळी त्यांना मला आम्ही शिवाजी महाराजांच्या आचारानं विचारानं काम करतो हे दाखवून द्यायचं होतं. मी जेव्हा निर्णय घेतो तेव्हा मागं जात नाही, असं ते म्हणाले. हीच शिवाजी महाराजांची युद्ध निती होती. रावत दिल्ली घरी आले होते त्यावेळी त्यांनी छत्रपती ताराराणी यांचा फोटो पाहिला. ताराराणींचा फोटो पाहिला त्यावेळी त्यांनी या कोणं आहेत असं विचारलं? मी त्यांना ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आहेत. तारारणी यांनी औरंगजेबाशी शेवटचा लढा दिला आणि औरंगजेबाचा मृत्यू झाला. हे ऐकल्यावर बिपीन रावत अशा महिला सेनानी देशात तयार व्हायला हव्यात, असं म्हटल्याची आठवण छत्रपती संभाजी यांनी सांगितली.

रायगडावरील कार्यक्रमात रावत यांनी स्वतः बांधला होता डोक्यावर फेटा

रायगड या ठिकाणी नुकताच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांना फेटा बांधण्यात येणार असल्याचं मी रावत यांना त्यांना सांगितलं होतं. शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यास येतो त्यावेळी बिपीन रावत हे स्वत: फेटा बांधून आले होते. बिपीन रावत यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीनं फेटा बांधला होता. ते स्वत: फेटा बांधून आले होते, हे खरे वैशिष्टय म्हणावे लागेल.