सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
लाॅकडाऊनचे पालन सर्वांनी केले पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले एकटेच आले असल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी सांगितले.
सातारा शहरात वीकेंड लाॅकडाऊनची पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, वीकेंड लाॅकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक चाैकावर पोलिस आहेत. शासनाच्या नियमांचे जर कोणी पालन केली नाही, तर आम्ही कारवाई करणार आहे. ज्याला परवानगी नाही, त्याने दुकान उघडले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात आज केंद्रीय पथक आहे. पथकाने बाधितांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट १५ फेब्रवारीपासून सुरू झाली आहे. पोलिसांनी १३ हजारपेक्षा जास्त विनामास्क लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. तर तीनशेच्यावर एआयआर केल्या आहेत. बावधान यात्रा संबधी १०० पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. तेव्हा लोकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई शंभर टक्के होणारच.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा