साताऱ्यात खासदार उदयनराजे पुन्हा संतापले; शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत म्हणाले की…

Udayanaraje Bhosale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या जिल्ह्यात शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका असल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. अशात राजकीय नेते मंडळीही निवडणुकीत घडणाऱ्या घडामोडीवरून संतापत आहेत. आज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे यांचा आक्रमक पावित्रा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाला. सातारा बाजार समितीत APMC पात्र शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केल्याच्या कारणावरून उपनिबंधकांवर निशाणा साधला.

खा. उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या एका बैठकीत सहभागी झाले. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
उपनिबंधकांचा पेन इतका जड झालाय की ते टाळाटाळ करत आहेत. असले निष्क्रिय व नकारात्मक दृष्टीकोन असलेले अधिकारी पदावर बसतात, त्यावेळी लोकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? सहकारात काहीही चालते. या लोकांची टोळी सहकारात कार्यरत आहे.

सातारा मार्केट कमिटीचे उदाहरण घ्या. यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सगळे उघड असून सगळ्यांना माहिती आहे. मनवे त्याला निलंबित केलंय तरी अजून आहे. त्याच्या बंगल्यात कोण जाऊन राहिले याचा शोध घ्यावा. माझ्याकडून लोकांना अपेक्षा असल्या म्हणून मी काय त्यांच्या टोळीत सामील होऊ का? त्यावेळी त्यांच्या घोटाळ्यामुळे तुमच्यावर गदा येऊ नये म्हणून आम्ही आमच्या संचालकांचे राजीनामे घेतले होते.

आता काय करायचे ते बघू. याची संपूर्ण जबाबदारी उपनिबंधकांची आहे. लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला पाठीशी घालू नये. डीडीआरचा पेन इतका जड झालाय की ते टाळाटाळ करत आहेत. असले निष्क्रिय व नकारात्मक दृष्टीकोन असलेले अधिकारी पदावर बसतात, त्यावेळी लोकांनी काय अपेक्षा करायची?, असा प्रश्न त्यांनी केला.