MS Dhoni : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणारा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंघ धोनी IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरला आहे. 20 फेब्रुवारीला पहिल्या IPL लिलावाला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रसंग संस्मरणीय बनवण्यासाठी, आयपीएल टीव्ही ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सुमारे ७० पत्रकारांच्या मदतीने आयपीएलमधील ऑल टाइम्स बेस्ट संघ निवडला. या संघाच्या नेतृत्वाची धुरा धोनीकडे सोपवण्यात आली आहे. २००८ पासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने (MS Dhoni) चेन्नईला एकूण ५ आयपीएल चषक जिंकून दिले आहेत. तसेच आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर अश्यक्यप्राय विजय सुद्धा त्याने खेचून आणल्याचे आपण बघितलं असेल.
वसीम अक्रम, मॅथ्यू हेडन, टॉम मूडी आणि डेल स्टेन यासारख्या दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या समितीने आयपीएलचा सर्वोत्तम संघ निवडला. यामध्ये सलामीवीर म्हणून विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरला पसंती देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक डावखुला फलंदाज ख्रिस गेलची निवड करण्यात आली आहे. मधल्या फळीत मिस्टर IPL सुरेश रैना, ३६० क्रिकेटर जाणारा एबी डिव्हिलिअर्स आणि सूर्यकुमार यादव याना स्थान मिळालं आहे. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) , अष्टपैलू खेळाडूं म्हणून हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड आणि रवींद्र जडेजाला पसंती देण्यात आली आहे. राशीद खान, सुनील नरेन आणि युझवेंद्र चहल या फिरकीपटूंना तर लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह या दोन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली आहे.
कर्णधार म्हणून धोनीच – MS Dhoni
IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघाच्या कर्णधारपदी एकमताने महेंद्रसिग धोनीची निवड करण्यात आली आहे. यावेळी डेल स्टेन म्हणाला कि धोनीकडे नैसर्गिक नेतृत्व गुण आहेत आणि त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्व गोष्टी उत्कृष्टपणे हाताळल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांनी धोनी सह रोहित शर्माला सुद्धा कर्णधार म्हणून पसंती दिली, परंतु मुंबई इंडियन्सकडे नेहमीच चांगले खेळाडू होते असेही त्यांनी म्हंटल. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने तर धोनीला कर्णधार आणि प्रशिक्षकी अशा दोन्ही रूपात ठेवलं. त्याच्या मते धोनीने 2008 मध्ये कर्णधार म्हणून सुरुवात केली, त्यावेळी शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि प्रशिक्षक होता, त्याने संघाला चॅम्पियन बनवले. त्याचप्रमाणे धोनीही प्रशिक्षक होऊ शकतो.
IPL चा सर्वोत्तम संघ –
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशीद खान, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.